चुना पणं काढून घेतायं, तंबाखू खाऊ कशी? मोदींच्या सभेला आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा सवाल

blank

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा आज नाशिक येथे समारोप होते आहे. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितीत राहणार आहे. पंतप्रधान मोदी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात येत असल्याने निवडणुकीच्या दृष्टीने मोदी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच पंतप्रधान मोदी आज नाशिक मध्ये येत असल्याने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच विरोधकांनी कोणतीही निदर्शने करू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

आंदोलक निषेध म्हणून काळे कपडे घालून येतात त्यामुळे मोदींच्या आजच्या सभेत काळे कपडे घालून येण्यास बंदी घातली आहे. तसेच प्रवेश द्वारावर सुरक्षा रक्षक उभे केले असून सभेला येणेऱ्या नागरिकांची झडती घेतली जात आहे. या झडतीमध्ये पेन, कंगवे सापडल्यास जप्त केले जात आहे. कारण मोदींच्या आजच्या सभेला पेन आणि कंगवेही बॅन केले असल्याच दिसत आहे. विशेष म्हणजे चुना डबीलापण मज्जाव घातला असल्याच दिसत आहे. कारण झडती घेताना एका ज्येष्ठ नागरिकाकडे चुना डबी सापडली त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी ती डबी जप्ती केली. यामुळे ज्येष्ठ नागरिक संतप्त झाले आणि चुना नाही तंबाखू खाऊ कशी? असा उलट सवाल रक्षकांना केला.

दरम्यान नाशिकमध्ये दुपारी 1 वाजता मोदींची सभा पार पडणार आहे. नाशिकमधील तपोवन परिसरात 20 एकरमध्ये या सभेसाठी भव्य मंच उभारण्यात आला आहे. मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.