ब्रिक्स देशांच्या एकजुटीनेच शांतता व विकास शक्य – पंतप्रधान मोदी

बीजिंग : जगात शांतता नांदण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांनी एकजूट राखणे आवश्यक आहे. ब्रिक्स देशांच्या एकजुटीतूनच शांतता व विकास होणे शक्य आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. ते `ब्रिक्स’ देशांच्या नवव्या शिखर संमेलनात बोलत होते.ते म्हणाले की, देशाची युवाशक्ती हीच आमची सर्वांत मोठी ताकद आहे.

भारतात काळ्या पैशाविरोधातील लढा सुरू आहे. स्वच्छता अभियान राबवले जात आहे. गरिबांच्या कल्याणासाठी अनेक कार्यक्रम आम्ही राबवले आहेत. स्मार्ट सिटीसारखे प्रकल्प सुरु करून मार्गक्रमण करत आहोत. `ब्रिक्स’मध्ये पाच देश एकसारखेच आहेत. ब्रिक्स बॅंकेकडून देण्यात येणा-या कर्जामुळे सदस्य देशांना फायदाच होईल. याचा योग्य तो वापर झाला पाहिजे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

काही मुद्द्यांवर मतभेद तरीही विकासाच्या मुद्यावर `ब्रिक्स’ देश एकत्र – जिंनपिंग
जगभरात सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत. त्या आपल्या सहभागाशिवाय सोडवल्या जाऊ शकत नाहीत. `ब्रिक्स’ सदस्य देशांमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद असूनही विकासाच्या मुद्यावर आपण एकत्रित आहोत, असे प्रतिपादन चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी आज येथे केले.

`ब्रिक्स’ देशांच्या नवव्या शिखर संमेलनात बोलत होते.विकासाच्या मुद्यावर सर्व सदस्य देशांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे. यामुळे जगभरात शांतता व विकासाच्या दिशेने वाटचाल करता येईल. सद्यस्थितीत जगाची स्थिती पहाता `ब्रिक्स’ देशांची जबाबदारी आणखी वाढू शकते, असेही जिंनपिंग म्हणाले.