डच नागरिकांना मिळणार ५ वर्षांचा व्हिसा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

वेबटीम / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल नेदरलँडच्या दौऱ्यावर होते . यावेळी त्यांनी भारत आणि नेदरलँड या दोन्ही देशातील व्यापार वाढीसाठी सकारात्मक पावले उचलेली आहेत. डच नागरिकांना भारतात व्यापारी आणि पर्यटन व्हिजाची मुदत ५ वर्षांची करण्यात आली आहे. हा निर्णय मोदी यांनी काल नेदरलँड दौऱ्यावेळी जाहीर केला.  

नेदरलँड मधील कंपन्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांशी चर्चा पंतप्रधान मोदी यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी भारतातील सव्वाशे कोटी जनता म्हणजे एक मोठी बाजारपेठ असल्याचे म्हटले. सध्याच्या सरकारने भारतात व्यापारवृद्धीसाठी खूप चांगले वातावरण तयार केले असून नेदरलँड्समधील कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी, असे आवाहन यावेळी मोदींनी केले. यासाठी भारताकडून नेदरलँड्समधील व्यापारी आणि पर्यटक यांना पाच वर्षांचा व्हिजा देण्यात येईल असेही जाहीर करण्यात आले.