गेली २८ वर्षापासून असा करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्रीचा उपवास

p m narendra modi navratri fast

संपूर्ण देशभरात आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्रीमध्ये लाखो लोक उपवास करतात. कोणाचा उपवास केवळ फळे खावून असतो तर कोणाचा पाणी पिवून. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेली २८ वर्षापासून निरंक असा म्हणजेच केवळ पाणी पिवून नवरात्रीचा उपवास करतात. आजपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव २९ सप्टेंबरला संपेल, त्यानंतर दहाव्या दिवशी दसऱ्याचा सण साजरा केला जाणार आहे.

नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना नवरात्रीमध्ये दसऱ्याला करत असलेली शस्त्र पूजा हि देशभरात चर्चेचा विषय असायची. २००१ ते २०१४ या काळात गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना मोदी नेहमी आपल्या सुरक्षा रक्षकांसोबत शस्त्रांची पूजा करायचे. मोदीप्रमाणेच गोरखपूर येथील मठाचे अधिपती असणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही नवरात्रीत उपवास करतात. आज ते गोरखनाथ मंदिरात घटाची स्थापना करतील.

पंतप्रधान मोदी हे गेल्या २८ वर्षांपासून नवरात्रीचे उपवास करतात. पहिल्या दिवशी देवीची पूजा केल्यानंतर ते नऊ दिवसांच्या उपवास केवळ पाणीच पिवून करतात. एवढा कडक उपवास करूनही देशाचा कारभार सांभाळण्याच्या कामाचा व्याप ते कसा सांभाळतात असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र गेली २८ वर्षेपासून ते उपवास करत असल्यामुळे त्यांना विशेष त्रास जाणवत नाही