राज्यात आज वातावरण तापणार, पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंच्या तोफा धडाडणार

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात थंडीचा कडाका वाढला असला तरी आज राज्यातील राजकीय वातावरण कामालीच तापणार आहे. कारण आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा होणार आहे. अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यापासून भाजप – सेना या दोन्ही पक्षांतील सबंध कमालीचे ताणले गेले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असतील. आज (ता. ९) मोदींची सभा होणार आहे, बीडमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभा संपल्यानंतर १२ वाजता मोदी दिल्लीकडे रवाना होणार आहेत.

मोदी विविध विविध योजनांची पायाभरणी करणार आहेत. याच कार्यक्रमातून आगामी लोकसभा निवडणूकीसाठी प्रचाराचा बिगुल वाजवणार आहेत. मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचा प्रारंभ करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाकडून तगडे नियोजन करण्यात आले आहे.

दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांची बीडमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. दुष्काळी भागाची पाहणी ठाकरे करणार आहेत.

You might also like
Comments
Loading...