fbpx

पंतप्रधान मोदींची पत्रकार परिषद ही अभूतपूर्व घटना, मात्र त्या खोलीचा दरवाजा बंद -राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान मोदींची पत्रकार परिषद ही अभूतपूर्व घटना आहे. पंतप्रधान मोदी जिथे पत्रकार परिषद घेत आहेत, त्या खोलीचा दरवाजा बंद केला आहे. मी काही पत्रकारांना सांगितलं की आमच्या वतीने काही प्रश्न विचारा, पण त्यांना परवानगी दिली नाही असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे .

दरम्यान, दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद सुरू आहे.