मोदी देखील दहशतवादी संघटनेचे सदस्य, प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका

Prakash ambedkar

टीम महाराष्ट्र देशा: साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा सर्वत्र निषेध होत आहे, समाजामध्ये उमटलेल्या प्रतिक्रियानंतर साध्वी प्रज्ञासिंहने माफी मागितली आहे, यामध्ये आता साध्वीला लोकसभा उमेदवारी देणाऱ्या भाजपवर देखील टीका करण्यात येत आहे.

साध्वी प्रज्ञासिंहच्या विधानावर मौन बाळगणारे पंतप्रधान हे देखील दहशतवादी संघटनेचे सदस्य आहे, अशी जहरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे, कोल्हापूरमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि नरेंद्र मोदी यांच्यातील भेटीगाठी बाहेर काढू, असा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे.

करकरे आमच्यासाठी हिरो आहेत , जनतेने आता भाजप उमेदवारांबाबत विचार करावा

Loading...

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने केलेल्या विधानानंतर बोलताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी जनतेने भाजप उमेदवारांबद्दल विचार करावा असा सल्ला दिला होता, हेमंत करकरे दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले, त्यांच्या विषयी भाजप उमेदवार उलट सुलट वक्तव्य करतायत हे चुकीचे आहे. हेमंत करकरे हे आमच्यासाठी हिरो आहेत. त्यामुळे आता जनतेने देखील विचार करायला हवा की, जे करकरे दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले त्यांच्या विरोधकांना मत द्यावे का. असा सल्ला ओवैसी यांनी दिला होता.

साध्वी प्रज्ञासिंहचा आरोप चुकीचा, एटीएसने कधी छळ केलाच नाही

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटक असताना दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या सांगण्यावरून तुरुंगामध्ये छळ केला जात होता, असा आरोप भाजपच्या भोपाल लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंहने केला आहे, मात्र प्रज्ञासिंह ठाकूरकडून  करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं मानवी हक्क आयोगाने स्पष्ट केले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांच्याकडून केले जाणाऱ्या आरोपाची चौकशी करण्यासाठी आर.एस खैरे यांच्या अध्यक्षतेखाली मानवी हक्क आयोग समितीची स्थापना करण्यात आली होती, खैरे यांच्या समितीने 2015 साली साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेले आरोप सिद्ध होत नाहीत, असे सांगितले होते. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही साध्वीचे आरोप फेटाळून लावले होते.