मोदींच्या या ट्विटने फॉलोअर पडले गोंधळात

पंतप्रधान नरेंद मोदी आणि त्यांच सोशल माध्यमावर असलेल प्रेम जगजाहीर आहे.मोदीच्या ट्विट ची तर नेहमीच चर्चा होते.पण मोदींनी आज असे एक ट्विट केले जे अनेक फॉलोअरना समजल नाही कारण ते ट्विट हे जपानी भाषेमध्ये होत .

त्यामुळे अनेकांना त्याच भाषांतर करून ते ट्विट वाचाव लागल. जपानी पंतप्रधान शिंजो अबेचे स्वागत करण्यासाठी मोदींनी  हे ट्विट जपानी भाषेमध्ये केले होते. जपानी नेते  दोन दिवस गांधीनगर, गुजरात येथे12 व्या भारत-जापान वार्षिक परिषदेला उपस्थित राहणार आहेत त्या करता मोदींनी त्यांना या शुभेच्या पाठविल्या आहेत.