fbpx

मतदानानंतर पंतप्रधानांचा ‘मिनी रोड शो’; कॉंग्रेसचा आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

modi roadshow

टीम महाराष्ट्र देशा: आज मतदान केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मिनी रोड शो केला आहे. मतदानाचा हक्क बजावल्यनंतर शाई लावलेलं बोट दाखवत त्यांनी आधी पायी आणि नंतर गाडीच्या फूटबोर्डवरुन जवळपास ५०० मीटरहून जास्त अंतर एक मिनी रोड शोच केला. यावर आक्षेप घेत पंतप्रधानांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. तर निवडणूक आयोग मोदींच्या दबावाखाली काम करत असून मोदींना देशात एकही स्वायत्त संस्था अस्तित्वात ठेवायची नसल्याचा आरोप सुद्धा सुरजेवाला यांनी केला आहे.

दरम्यान, गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान आज पार पडत आहे. नरेंद्र मोदी हे आपले मोठे बंधू सोमभाई यांना चरणस्पर्श करून मतदान केंद्रात गेले ते मतदान करण्यासाठी बऱ्याच वेळ रांगेत उभे होते. त्यानंतर मोदींनी हा मिनी रोड शो केला आहे. आधी स्थानीक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल झाली आहे. आता निवडणूक आयोग पंतप्रधानाच्या या ‘मिनी रोड शो’ कडे कसे पाहते हे पाहण्यासारख असणार आहे.