fbpx

सोलापुरात पंतप्रधान मोदी यांच्या सभेची जय्यत तयारी

 सोलापूर – पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भात पिएमओ कार्यालयाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोलापुरात सुरक्षा संदर्भात पाहणी केली आहे. पंत्रप्रधान नरेंद्र मोदी हे हेलिकॉप्टरने बिदर मार्गे सोलापुरात येणार आहेत.सोलापुरातील विविध कामांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पार्क मैदानावर मोदी यांची विराट सभा होणार आहे. विशेष म्हणजे, मोदी यांच्या सभेपूर्वी संपूर्ण पार्क मैदानावर सुरक्षेच्यादुर्ष्टीने सीसीटीव्ही लागणार आहेत.

बुधवारी सकाळी दहा ते बारा दरम्यान त्यांचे आगमन होणार आहे.याबाबत सविस्तर माहिती पीएमओ कार्यालयाकडून सोमवार सायंकाळपर्यंत असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी रामचत्र शिंदे यांनी दिली. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून सुरु असलेल्या तयारी बाबत पीएमओ कार्यालयाने आढावा घेतला.

एकीकडे जिल्हा प्रशासन पंतप्रधान मोदी यांच्या सभेची तयारी करीत आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष देखील युद्धपातळीवर मोदींच्या सभेची तयारी करीत आहे. बुथनिहाय कार्यकर्त्यांना एकवटण्याचे काम भाजपकडून सुरु आहे.