fbpx

आषाढी एकादशी : पंतप्रधान मोदींनी आषाढीनिमित्त विठ्ठलभक्तांना दिल्या मराठीत शुभेच्छा

टीम महाराष्ट्र देशा : भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी…एक एक पाऊल टाकत आता विठ्ठलाचं रुप पाहण्यासाठी आता डोळे आतूर झाले आहे. आज आषाढी असल्यामुळे पंढरपूर वारकऱ्यांनी फुलून गेलं आहे. अलोट गर्दी पंढरपुरात झाली आहे. चंद्रभागेचे स्नान आणि दर्शन विठ्ठलाचे घडावे मज जन्मोजन्मी अशी प्रत्येक वारकऱ्याची इच्छा असते. अशी इच्छा घेऊन आज हजारो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत.

दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विठ्ठलभक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.आषाढी एकादशीच्या सर्व नागरिकांना मन:पूर्वक शुभेच्छा! विठुराया आणि रखुमाईच्या कृपेने सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त व्हावे, ही माझी विनम्र प्रार्थना! असा पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मराठीत शुभेच्छा संदेश दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाचा महिमा आणि वारीचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.