मोदींनी प्रवास केलेल सी प्लेन वादाच्या भोवऱ्यात

narendra modi sea plan 3

टीम महाराष्ट्र देशा : गुजरात निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सी प्लेन नी प्रवास केला होता. त्यानंतर त्यावर बरीच टीका देखील झाली आहे. आता सध्या नवीन चर्चा या सी प्लेनच्या बाबतीत समोर आली आहे. नरेंद्र मोदी यांनी प्रवास केलेलं सी-प्लेन आता चक्क कराचीहून आल्याचा दावा करण्यात आला आहे. अल्ट न्यूज नावाच्या वेबसाईटने याबाबतचा दावा केला आहे.

N181KQ असं नाव असलेलं हे सी-प्लेन वापरून नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या प्रचारासाठी प्रवास केला होता. N181KQ या नावाचे सी प्लेन जगभर प्रवास करतं असत,मात्र मोदींनी प्रवास करण्यापूर्वी ते चक्क कराचीहून मुंबईत आलं होतं आणि त्यानंतर अहमदाबादला दाखल झाल होत. पण आता हेच सी प्लेन आता चर्चेचा विषय झाला आहे.pm-modi-travel-first-ever-seaplane-india-no/

 

सी प्लेन मधून प्रवास केलेलं नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान असल्याच्या बातम्या येत आहेत. परंतु सी प्लेन्चा वापर याआधी देखील वापरण्यात आला आहे. त्यामुळे हा दावा खोटा असल्याची माहिती राष्ट्र्वाधीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. त्यासंदर्भात ट्वीट देखल प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.