मै नरेंद्र दामोदारदास मोदी…सलग दुसऱ्यांदा  घेतली मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ  

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा सुरु आहे.
लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आज सायंकाळी ७ वाजता नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे.

भारतातील आणि विदेशातील मिळून ८ हजार लोकांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. या सोहळ्याला दिग्गजांची हजेरी आहे. आपल्या सगळ्या कर्तव्यांचा मी पालन करेन. मी कोणत्याही प्रकारचा पक्षापात करणार नाही असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सात वाजल्यापासून हा सोहळा रंगला आहे.