PM MODI- दस्तुरखुद्द मोदी घेणार या छोट्या मुलाची भेट

 पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायल दौ-यादरम्यान  एका छोट्या मुलाची खास  भेट घेणार आहेत. अवघ्या आठ वर्षाच्या या मुलाच्या भेटीकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागलेल्या आहेत .
  2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या माता-पित्याला गमावलेल्या मोशे होल्ट्जबर्ग या मुलाची भेट मोदी घेणार आहेत. मुबाईवर जेव्हा  26/11 चा  दहशतवादी हल्ला झाला तेव्हा मोशे केवळ 2 वर्षाचा होता.दहशतवादी हल्ल्यात मोशेची आई रिवका आणि वडिल गेवरिल होल्ट्जबर्ग यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला होता.
या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी ताज हॉटेलसोबतच नरीमन हाऊसलाही लक्ष्य केले होते.तेथे 2 वर्षाचा मोशे आपल्या आई-वडिलांसमवेत होता.दहशतवाद्यांनी तेथे घुसताच तत्काळ फायरिंग सुरु केले व सर्वांना ठार मारले.मात्र,बेबी मोशेची देखरेख करणारी मोलकरीण सॅंन्ड्रा सॅम्मुअल नावाची भारतीय महिला मोशेला घेऊन लपली होती,ज्यामुळे मोशेचा जीव वाचला.यानंतर रेस्क्यू ऑपरेशननंतर सॅंड्रा आणि मोशेला बाहेर काढले.मोशेला जगभरातून सहानुभूती मिळाली.
 इस्त्रायली सरकारने मोशेचा जीव वाचविल्याबाबत सॅंड्राचे मोठे कौतूक केले.तसेच मोशेची देखभाल करण्यासाठी इस्त्रायलला बोलवून घेतले.इस्त्रायलमध्ये
ज्यू लोकांशिवाय इतर कोणत्याही लोकांना नागरिकत्व मिळत नाही.मात्र,सॅंड्राला इस्त्रायलचे नागरिकत्व दिले गेले.सँड्रा आता मोशेसोबत त्याच्या आजी-आजोबासोबत राहते.मोशे आता 11 वर्षाचा झाला आहे.