अन अचानक भर सभेत मोदींनी पाच मिनिटे भाषण थांबविले.

मोदिनी तो आवाज ऐकला आणि ते स्तब्ध राहिले

टीम महाराष्ट्र देशा – गुजरात निवडणुकीचे वारे चांगलेच तापू लागले आहे. भाजप,कॉंग्रेस आपली संपूर्ण ताकदपणाला लावत आहे. राहुल गांधी देखील गुजरातमध्ये तळ ठोकून बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील निवडणुकीच्या प्रचारात सक्रीय झाले आहे गुजरातच्या विविध भागात सभा घेत आहेत.

नरेंद्र मोदींनीही काल सौराष्ट्रात प्रचार सभा घेतल्या. नवसारीमध्ये त्यांची प्रचारसभा सुरू होती. मोदींनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली होती. भाषण रंगात आले असतानाच अजानचा आवाज ऐकू आला. त्यामुळे मोदींनी मध्येच भाषण थांबवले. अजान पूर्ण होईपर्यंत ते स्तब्ध राहिले.

गेल्या वर्षी पश्चिम बंगालच्या खडगपुरात निवडणूक प्रचार सभेत बोलताना मोदींनी रंगात आलेले भाषण अजान सुरू होताच मध्येच थांबवले होते. अजान संपेपर्यंत, म्हणजेच सुमारे साडेपाच मिनिटे ते स्तब्ध राहिले. ‘अजान सुरू असल्यामुळे आपण काही क्षणांची विश्रांती घेतली. माझ्यामुळे कुणाची पूजा, प्रार्थना बाधित होता कामा नये.’ असे मोदी म्हणाले होते.