fbpx

पायाभरणी तर आम्ही करतोच पण उद्धाटन देखील आम्हीच करतो : पीएम मोदी

टीम महाराष्ट्र देशा- आपणच भूमीपूजन केलेल्या एनएच २११ अर्थात सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद महामार्गाचं तसंच सांडपाणी प्रक्रिया केंद्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटचं बटन दाबून उद्घाटन केलं. मोदींच्या या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. कम्युनिस्ट आणि विडी कामगार नेते नरसय्या आडाम हेदेखील यांनीदेखील या सोहळ्याला हजेरी लावली.

दरम्यान विविध कामांच्या उद्घाटनासाठी ,पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापुरात आले होते. नेहमीप्रमाणे यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली आहे. सोलापूरकरांनी आशीर्वाद दिल्याबद्दल नरेंद्र मोदींनी सोलापुरकरांचे आभार मानले.

आमचे सरकार येण्यापूर्वी देशात ९० हजार किमीचे महामार्ग होते. आता ते १ लाख २३ हजार किमीचे झाले आहेत. याचाच अर्थ गेल्या साडेचार वर्षांत आम्ही ४० हजार किमीचे महामार्ग बनवले अशी माहिती मोदी यांनी दिली.आपल्या सरकार अधिक कार्यक्षम असल्याचं प्रमाण देताना विकासकामांची पायाभरणी तर आम्ही करतोच पण उद्धाटन देखील आम्हीच करतो असं ठासून सांगितलं