‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत मोदींना आईचा पाठिंबा; केली ‘लाख’मोलाची मदत

narendra modi cast vote

नवी दिल्ली : ‘कोरोना’विरुद्ध लढाईसाठी अनेक मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम केअर्सला त्यांच्या आई हिराबेन यांनीही पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांनी सोमवारी ही रक्कम पीएम केअर्स फंडमध्ये दान केली.

तसेच हिराबेन यांनी ही रक्कम त्यांच्या बचतमधून जमलेल्या पैशातून केली आहे. याचप्रमाणे अनेक उद्योजक आणि सेलिब्रिटींनी आपली मदत दिली. यादरम्यान पंतप्रधानांच्या आईनेही त्यांची एक ‘लाख’मोलाची मदत दिली.

अनेक उद्योगपती आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे.कोरोनाशी सामना करण्यासाठी रिलायंसने पीएफ रिलीफ फंडला 500 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय रिलायंस कंपनी महाराष्ट्र आणि गुजरात सरकारला प्रत्येकी 5 कोटींची मदत करणार आहे.

दरम्यान, योगगुरु बाबा रामदेव यांनी कोरोना संसर्ग विरुद्ध सुरू असलेल्या लढाईसाठी पतंजली योगपीठकडून महत्वाचे योगदान दिले आहे. बाबा रामदेव यांनी पतंजली योगपीठाकडून योगदान देत पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी २५ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे.