fbpx

भाजपची ‘ही’ कृती म्हणजे त्यांच्या निराश मनोवृत्तीचे द्योतक-पी.चिदंबरम

p-chidambaram

टीम महारष्ट्र देशा: निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा भंग म्हणून फक्त राहुल गांधी यांच्या भाषणावरच कारवाईचा बडगा का उगारला? राहुल यांच्याकडून स्पष्टीकरण मागवत असतानाच आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या इतर नेत्यांनी केलेल्या भाषणांकडे दुर्लक्ष केले. प्रचाराची मुदत संपल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षातील व्यक्तीने मुलाखत देऊ नये, हा नियम सर्वांसाठी सारखा असला पाहिजे. मात्र, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही मुलाखती दिल्या. मग निवडणूक आयोगाने एकट्या राहुल गांधींनाच नोटीस का धाडली ? असा प्रश्न देशाचे माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी केला आहे. तर भाजपची ही कृती म्हणजे त्यांच्या निराश मनोवृत्तीचे द्योतक असल्याचा टोला सुद्धा त्यांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येला काही स्थानिक वृत्तवाहिन्यांना दिलेली मुलाखत म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार भाजपने निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती.

या विरोधात ट्विट करून चिदंबरम यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.