कॅशलेस व्यवहारासाठी बाबासाहेबांच्या नावाचे ‘भीम’ अ‍ॅप लॉंन्च

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल व्यवहारासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असलेले ‘भीम’ हे अॅप लाँच केलं आहे. या अॅपद्वारे आर्थिक व्यवहार करण्यासाठी ग्राहक म्हणून इंटरनेट किंवा कोणत्याही स्मार्टफोनची गरज नाही, असं मोदींनी सांगितलं. नवी दिल्लीत डिजीधन मेला या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी भिम अॅप लाँच केलं.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हे अॅप समर्पित असल्याचंही मोदींनी सांगितलं. त्यांच्या भिमराव नावापासूनच या अॅपचं नामकरण केलं असल्याची माहिती मोदींनी दिली.

या अॅपमुळे गरिबांना व्यवहार सोपे होणार आहेत. केवळ अंगठा लावून पेमेंट करता येईल. एवढंच नाही, तर हे अॅप गरिबांच्या घरातील आर्थिक महासत्ता असेल, असंही मोदींनी सांगितलं.

एकेकाळी अशिक्षिताला अंगठे बहाद्दर म्हटलं जायचं, पण आता काळ बदललाय, आता तुमचा अंगठाच तुमची ओळख, तुमची बँक असेल, असं मोदी म्हणाले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हे अॅप समर्पित असल्याचंही मोदींनी सांगितलं. त्यांच्या भिमराव नावापासूनच या अॅपचं नामकरण केलं असल्याची माहिती मोदींनी दिली. डिजि-धन मेळाव्यात या अ‍ॅपचे मोदींनी उदघाटन केले. याच डिजि-धन योजनेअंतर्गत पुढील १०० दिवसांमध्ये एकूण ३४० कोटी रूपयांची बक्षिसे दिली जाणार असल्याची घोषणा मोदींनी यावेळी केली. १४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी हा मेगा लकी ड्रॉ काढला जाणार असून या माध्यमातून करोडो रूपयांची बक्षिसे वाटण्यात येणार आहेत.

एका नेत्याने म्हटले होते की, खोदा पहाड निकली चुहीया असं एक नेता (चिदंबरम) म्हणाला होता, मात्र मला उंदीरच बाहेर काढायचे आहेत, तेच जास्त कुरतडतात, असेही ते म्हणाले. आधी बातम्या असायच्या की, कोळशात किती गेले, २जीमध्ये किती गेले, आज बातम्या येतात की, किती आले, असा टोला त्यांनी कॉंग्रेसला लगावला आहे.

You might also like
Comments
Loading...