जनधन खातेधारकांसाठी मोदींची मोठी घोषणा

narendra modi

नवी दिल्ली : गरीब-दुर्बल घटकांना मुख्य आर्थिक प्रवाहात सहभागी करून घेण्याच्या उद्देशानं सुरू झालेल्या ‘प्रधानमंत्री जन-धन योजने’ला 15 ऑगस्टला चार वर्षं पूर्ण होणार आहेत. त्या निमित्ताने, जन-धन खातेधारकांसाठी एखादी मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या स्वातंत्र्यदिनी करणार असल्याची माहिती समोर येतीये.

Loading...

जन-धन खातं सहा महिने योग्य प्रकारे चालू राहिल्यास खातेदाराला बँकेकडून 5 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. ही मर्यादा वाढवून थेट दुप्पट – म्हणजेच 10 हजार रुपये करण्यात येऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यासोबतच, पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मायक्रो इन्शूरन्स स्कीमची घोषणा होण्याचीही शक्यता आहे. रुपे कार्डधारकांना मिळणाऱ्या मोफत दुर्घटना विम्याची रक्कम 1 लाख रुपयांनी वाढवण्याचा विचारही सरकार करत असल्याची माहितीये.

आम्हाला उपवास करण्याची सवय आहे काँग्रेससारखी आमची फाईव्ह स्टार संस्कृती नाही

दीडपट हमीभाव म्हणजे भाजपचा चुनावी जुमला – अजित पवार

 

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...