पंतप्रधानच घेऊ शकतात जेटलींचा राजीनामा ; पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याने खळबळ

blank

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थमंत्री अरुण जेटलींवर नाराज असल्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊ शकतात. मात्र जेटलींनी यावर स्पष्टीकरण न दिल्यास त्यांच्या राजीमाम्याची आम्हीच मागणी करु, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर नाराज आहेत.असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

एकीकडे नीरव मोदी प्रकरणी विरोधक मोदींवर निशाणा साधत आहेत. मोदींनी या प्रकरणात अद्याप मौन बाळगलेलं आहे. तर दुसरीकडे मोदी अर्थमंत्री जेटलींवर नाराज असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

कसा झाला घोटाळा ?

देशविदेशात व्यापार असणाऱ्या नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँक मुंबई शाखेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याची कंपनी असणाऱ्या आर यूएस, सोलर एक्सपोर्ट्स आणि स्टेलर डायमंड्सच्या खरेदी विक्रीसाठी LOU मिळवला. LOU (लेटर ऑफ अंडरटेकिंग) म्हणजे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेला देण्यात येणारी टाईम गॅरंटी. म्हणजेच एखद्या बँकेने कोणत्याही व्यक्तीला अशी गॅरंटी दिली असेल आणि त्याच्या विश्वासावर दुसऱ्या बँकांनी कर्ज दिल्यास ते संबंधित व्यक्तीने परतफेड न केल्यास गॅरंटी देणाऱ्या बँकेला ते भरावे लागते. याच गॅरंटीच्या भरवशावर भारतीय बँकाच्या विदेशी शाखा असणाऱ्या AXIS बँक, इलाहाबाद बँक आणि युनियन बँक यांनी नीरव मोदीला क्रेडीट लोन दिले. हा घोटाळा समोर आल्यानंतर आता सरकारकडून सर्व बँकांना त्यांचे बॅलन्सशीट सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोण आहे नीरव मोदी

नीरव मोदी हा मुळचा बेल्जियमचा राहणारा हिरे व्यापारी. १९९९ मध्ये त्याने आपल्या कंपनीची सुरुवात केली. फोर्ब्स मासिकानुसार मोदी याची आजची सं पत्ती ११ हजार कोटींच्या आसपास आहे. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत त्याचा ८४ व क्रमांक लागतो. त्यांचे ज्वेलरी शोरूम लंडन, न्यूयॉर्क, लास वेगास, हवाई, सिंगापुर, बीजिंग सारख्या 16 शहरांमध्ये आहेत. भारतामध्ये दिल्ली आणि मुंबईत त्याचे बुटिक आहेत.