माती कपाळाला लावून मोदींनी केली शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त

modi in vadanagar school

टीम महाराष्ट्र देशा :पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच आज वडनगर या त्यांच्या जन्मगावी गेले.सर्वप्रथम  गावात गेल्याबरोबर मोदींनी त्यांच्या शाळेला भेट दिली.ज्या शाळेने मोदींना घडवलं त्या शाळेची पायरी चढताच जमीनीवर माथा टेकवला आणि कपाळाला त्याठिकाणची  माती लावली. यावेळी मोदी अत्यंत भावूक झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आज ते त्यांच्या जन्मगावी वडनगरला पोहचले. गावात जाताच त्यांनी  ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेला भेट दिली आणि शाळेची माती कपाळाला लावली. त्यानंतर शाळेच्या प्रत्येक वर्ग खोल्यात जाऊन पाहणी केली. विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला.