भारत-इस्रायल देशात 7 महत्वपूर्ण करार

Pm modi israel
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऎतिहासिक इस्रायल दौ-याच्या दुस-या दिवशी दोन्ही देशांमध्ये अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. भारत आणि इस्रायल यांच्यात कृषी, सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, स्पेस आणि पाणी व्यवस्थापनसारख्या एकूण 7 करारांवर स्वाक्ष-या करण्यात आल्या. नेतन्याहू आणि मोदी यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
भारत-इस्रायल यांच्यात झालेले 7 करार खालीलप्रमाणे :
1) 40 मिलियन डॉलरच्या भारत-इस्रायल इंडस्ट्रीयल R & D अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजिकल इनव्हेंशन फंडसाठी एमओयू.
2) भारताच्या जल संरक्षणासाठी एमओयू.
3) भारतातील राज्यांमध्ये पाण्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एमओयू.
4) भारत-इस्रायल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कॄषीसाठी ३ वर्षांच्या कार्यक्रमाची घोषणा
5) इस्रो आणि इस्रायल यांच्यात आण्विक क्षेत्रात सहयोगाची योजना
6) जीईओ-एलईओ ऑप्टिकल लिंकसाठी एमओयू.
7) लहान सॅटेलाईटसना विज देण्यासाठी एमओयू.Loading…


Loading…

Loading...