मोदींना पंतप्रधानपदाचा इगो – अण्णा हजारे

अण्णा हजारे

टीम महाराष्ट्र देशा: ”शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत मागील 3 वर्षात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 30 हून अधिक पत्रं लिहिली. मात्र यातील एकाही पत्रावर त्यांचं उत्तर आलं नाही. मोदींना पंतप्रधानपदाचा इगो आहे, म्हणूनच ते उत्तर देत नाहीत” अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.

”माझी आंदोलने, माझ्या सभा या मतं मिळवण्यासाठी नसतात. लोकपालसाठी जसं दिल्लीत आंदोलन झालं, तसंच आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोठं आंदोलन होईल ”कुठे आंदोलन झालं नाही, असं आंदोलन करत जेलभरो आंदोलन करून सरकारला धडकी भरवू”, असा इशाराही त्यांअण्णा हजारे यांनी दिला आहे. ते सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये आयोजित सभेत बोलत होते.