दलितांसाठी तुम्ही काय केलं ? भाजपा खासदाराचा मोदींना सवाल

narendra modi and dalit protest

टीम महाराष्ट्र देशा- भारतीय जनता पक्षाने दलितांसाठी काहीच का केले नाही ? असा सवाल भाजपचेच खासदार करू लागले आहेत. उत्तर प्रदेशातील दलित खासदार छोटेलाल खारवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तक्रार केल्यानंतर आता आणखी एका दलित खासदाराने पंतप्रधानांना पत्र लिहून दलितांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. केंद्र सरकारने देशातील दलित लोकसंख्येसाठी काहीही केले नसल्याचा आरोप नागिना येथील भाजपा खासदार यशवंत सिंह यांनी केला आहे. यापूर्वी खासदार छोटेलाल खारवार यांनी योगी आदित्यनाथाबद्दल पंतप्रधानांकडे तक्रार केली होती. योगींनी आपल्याला वाईट वागणूक दिली असा त्यांनी आरोप केला होता.

नेमकं काय म्हणाले भाजपा खासदार यशवंत सिंह ?
मी केवळ आरक्षणामुळे खासदार झालो तुम्ही माझ्या क्षमतेचा वापर करुन घेतला नाही. केंद्र सरकारने देशातील दलित लोकसंख्येसाठी काहीही केले नाही. चार वर्षात देशातील ३० कोटी दलितांसाठी काहीही केले नाही. एसी/एसटीसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.Loading…
Loading...