मंत्रिपदासाठी मोदींकडे शिष्टमंडळ पाठवणाऱ्या खासदार दिलीप गांधींची उमेदवारी धोक्यात ? 

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील खासदार दिलीप गांधी हे हे नवनवीन वादात अडकल्याच नेहमीच पाहायला मिळत. आता तर दिलीप कुमार मनसुखलाल गांधी यांनी थेट आपल्याला मंत्रीपद द्यावं या मागणीसाठी एक शिष्टमंडळ दिल्लीला पाठवल्याचं बोललं जातंय. आणि विशेष म्हणजे गांधी हे जैन खासदार असल्याने मंत्रीपद द्यावे अशी मागणी या शिष्टमंडळाने केली होती.

दरम्यान, या शिष्टमंडळाला पंतप्रधान नरेंद्र यांनी झाप-झाप झापल्याची बातमी समोर येत आहे. आधी पक्षाचं काम करा, नंतर मंत्रीपदाचं पाहू असं मोदींनी शिष्टमंडळाला बजावल आहे. यामुळेच मोदी खासदार गांधींवर नाराज असून गांधींचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये भाजपच्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे स्वतः उपस्थित राहणार आहेत. यावेळी येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांना हरवण्यासाठी रणनीती आखण्यात येईल. शिवाय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नगरचे खासदार दिलीप गांधींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज आहेत. त्यामुळे गांधींची उमेदवारी धोक्यात आल्याचं बोललं जातंय.