‘पीएम मोदी विदेशातही हिंदीत बोलतात, मग आपल्याला का लाज वाटते?’, अमित शाहांचा सवाल

नवी दिल्ली : भारताला भाषांच्या बाबतीतही स्वावलंबी होण्याची गरज आहे. मातृभाषेसह हिंदीत व्यवहार करण्याची प्रतिज्ञा करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. मंगळवारी हिंदी दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा परदेशात जातात तेव्हाही हिंदीत संवाद साधतात. तर मग आपल्याला हिंदी बोलायची का लाज वाटली पाहिजे असा प्रश्नही अमित शाह यांनी उपस्थित केला.

‘भाषा हे अभिव्यक्तीचे माध्यम आहे. एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन त्याच्या अंगीभूत असलेल्या गुणांमुळे होते. ती व्यक्ती कुठल्या भाषेत बोलते त्यावरून तिचे मूल्यमापन होत नाही. अनेक देशांनी आपल्या भाषेचा सन्मान करून तिचे जतन करून व्यापार, विज्ञान सारख्या क्षेत्रात प्रगती केली आहे. आपणही आपली भाषा बोलताना लाजले नाही पाहिजे. आत्मनिर्भर असणे म्हणजे केवळ देशामध्ये उत्पादन करणे नव्हे, भाषांच्या बाबतीतही आपण ‘आत्मनिर्भर’ असणे आवश्यक आहे. ते दिवस गेले जेव्हा हिंदीत बोलणे हा चिंतेचा विषय होता, असंही अमित शाह म्हणाले.

दरम्यान, अमित शाह यांनी हिंदी दिनाच्या शुभेच्छाही दिल्यात. ‘हिंदी दिवसाच्या निमित्ताने, मी सर्व देशवासियांना विनंती करतो की, मूलभूत कार्यांमध्ये त्यांच्या मातृभाषेसह हिंदी ही अधिकृत भाषांपैकी एक असलेल्या हिंदीचा उत्तरोत्तर वापर करण्याची प्रतिज्ञा घ्या. भारताची प्रगती मातृभाषा आणि राजभाषा यांच्या समन्वयात आहे. आपणा सर्वांना हिंदी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा’, असे ट्विट त्यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या