PM Kisan Yojana | सरकारचं ठरलं! शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘या’ तारखेला येणार 13 वा हप्ता

PM Kisan Yojana | टीम कृषीनामा: प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला आहे. शेतकरी गेल्या काही दिवसांपासून या योजनेतील 13 व्या हप्त्याची वाट पाहत आहे. तेराव्या हप्त्यासाठी सरकारने कडक नियम जारी केले आहे. कारण या योजनेतील बारावा हप्ता मिळवण्यासाठी काही शेतकऱ्यांनी बघणावटी कागदपत्रांची मदत घेतली होती. त्यामुळे तेरावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी आणि ई-केवायसी करून घेणे अनिवार्य केले आहे.

‘या’ तारखेला मिळणार 13 वा हप्ता  (13th installment to be received on ‘this’ date)

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू केली होती. येत्या 24 फेब्रुवारीला या योजनेला चार वर्षे पूर्ण होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 24 फेब्रुवारीला केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात तेरावा हप्ता जमा करू शकते. तेरावा हप्ता जारी करण्याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. शेतकरी सरकारकडून अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट बघत आहे.

योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 10.45 कोटींवर पोहोचली (The number of beneficiaries of the scheme reached 10.45 crores)

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेतील बारावा हप्ता पाठवला होता. देशातील करोडो शेतकऱ्यांनी या योजनेतील 12 व्या हप्त्याचा लाभ घेतला आहे. 2019 मध्ये जेव्हा ही योजना सुरू करण्यात आली होती तेव्हा लाभार्थ्यांची संख्या 3.16 कोटी होती. 2022 मध्ये ही संख्या 10.45 कोटी पर्यंत पोहोचली आहे. या योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी सरकार सातत्याने अपात्र शेतकऱ्यांना यादीतून काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे.

PM किसान योजना हेल्पलाइन नंबर (PM Kisan Yojana Helpline No)

शेतकरी पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर क्रमांक 155261 किंवा टोल फ्री क्रमांक 1800-115-526 आणि 011-23381092 या नंबरवर कॉल करू शकतात. या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमची समस्या नोंदवू शकता किंवा पीएम किसान योजनेच्या संबंधित प्रश्न विचारू शकता. त्याचबरोबर तुम्ही pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडी द्वारे देखील आपली समस्या कळवू शकतात.

महत्वाच्या बातम्या

Dry Throat | घसा पुन्हा-पुन्हा कोरडा होत असेल, तर करून बघा ‘हे’ घरगुती उपाय

Dark Spots | चेहऱ्यावरील डागांची समस्या दूर करण्यासाठी कोरफडीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Skin Care | फेशियल केल्यानंतर चेहऱ्यावरील चमक कायम ठेवण्यासाठी वापरा ‘या’ गोष्टी

Camphor And Coconut Oil | केसांना खोबरेल तेल आणि कापूर लावल्याने मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Wheat Flour | नैसर्गिक पद्धतीने त्वचेची काळजी घेण्यासाठी गव्हाच्या पिठाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.