‘या’ चुका तुम्हीही केल्या असतील तर तुम्हाला मिळणार नाही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ

पंतप्रधान किसान सन्मान निधी

नवी दिल्ली – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना मोदी सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी लक्षात घेऊन सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार एका वर्षामध्ये  शेतकऱ्यांना हप्त्यांमध्ये सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देते. दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होतात. आतापर्यंत 8 हप्त्यांमध्येशेतकऱ्यांच्या  खात्यावर पैसे पाठविण्यात आले आहेत.

तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नोंदणी करावी लागेल. यासाठी अशी अट आहे की आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलेले असावे. ही अट आसाम, मेघालय, जम्मू-काश्मीरसाठी लागू केलेली नाही.दरम्यान, असे बरेच शेतकरी आहेत, ज्यांना या योजनेसाठी अर्ज करून देखील कोणत्याही हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत. कृषी विभागाने केंद्र सरकारकडे पाठवलेल्या काही फॉर्ममध्ये पीएफएमएसद्वारे निधी हस्तांतरित करताना अनेक चुका आढळल्या आहेत, ज्यामुळे हप्ता रक्कम हस्तांतरित केली जात नाही असं समोर आले आहे.

शेतकऱ्यांना त्यांची नावे इंग्रजीत लिहिणे आवश्यक आहे. आपण हिंदी किंवा अन्य भाषेत नाव लिहिले असेल आणि त्यात चुका असतील तर त्या सुधारणे आवश्यक आहे.अर्ज  करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये चुका टाळाव्या. बँकेचा आयएफएससी कोड लिहिण्यात कोणतीही चूक होऊ नये.बँक खाते क्रमांक सुद्धा अचूक असावा. आपला पत्ता,गावाच्या नावाची स्पेलिंग लिहिण्यात देखील कोणतीही चूक नसावी.या सर्व चुका आधारच्या माध्यमातून दुरुस्त करता येऊ शकतात.कुठल्याही प्रकारची चूक असल्यास आपले दोन हजार रुपये अडकतील.

सर्वप्रथम आपल्याला पंतप्रधान किसान यांच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर भेट द्यावी लागेल. यानंतर, येथे आपल्याला वरच्या दिशेने फॉर्मर्स कॉर्नरचा दुवा दिसेल. आपण या दुव्यावर क्लिक केल्यास, आधार संपादनाची एक लिंक दिसेल, जिथे आपल्याला क्लिक करावे लागेल. यानंतर आपल्यासमोर उघडल्या जाणाऱ्या पृष्ठावर आपण आपला आधार नंबर दुरुस्त करू शकता. दुसरीकडे, जर खाते क्रमांक चुकीच्या पद्धतीने प्रविष्ट केला गेला असेल तर आपण तो दुरुस्त देखील करू शकता. यासाठी आपल्याला आपल्या कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा लेखपालशी संपर्क साधावा लागेल. तेथे जाऊन आपण त्यातून केलेली चूक सुधारू शकता.

महत्वाच्या बातम्या 

IMP