‘पंतप्रधानांच्या हस्ते आज ‘संसद टीव्ही’ वाहिनीचे उद्घाटन’

narendra modi

नवी दिल्ली : आज १५ सप्टेंबररोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘संसद टीव्ही’ या नवीन सरकारी वाहिनीची सेवा उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान मोदी आज त्याचे उद्घाटन करणार आहेत.

ही नवीन वाहिनी लोकसभा आणि राज्यसभा टीव्हीच्या विलीनीकरणाद्वारे तयार केली गेली आहे. यावेळी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदीआणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संसद भवनाच्या मुख्य कमिटी रूम मध्ये आज संध्याकाळी ६ वाजता संसद टीव्हीचे संयुक्तपणे उद्घाटन  करणार आहेत. आज जागतिक लोकशाही दिन आहे. यानिमित्तानेच या नवीन वाहिनीचे लोकार्पण केले जाणार आहे.

या वाहिनीचे प्रोग्रामिंग चार श्रेणींमध्ये असणार आहे. संसद आणि लोकशाही संस्थांचे कामकाज, धोरणे आणि योजनांची अंमलबजावणी, भारताचा इतिहास, संस्कृती आणि समस्या, समकालीन स्वरूपाच्या चिंता या विषयांचा समावेश या नवीन वाहिनीमध्ये असणार आहे.

महत्वाच्या बातम्या