११ ते १४ एप्रिलपर्यंत ‘लसीकरण उत्सव’ पंतप्रधान मोदींची घोषणा…

पंतप्रधान नरेंद्र मोदीं

नवी दिल्ली: महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचा आरोप गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारकडून केला जात आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला पुरेसा लशीचा साठा देत नसल्याचा आरोप केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी फेटाळून लावला असून महाराष्ट्रात लशीच्या तुटवड्यावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्यातील महाविकास आघाडी सरकार अशा नवीन वादाला सुरुवात झाली आहे.

आता याच मुद्द्यावरून राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. केंद्रीयमंत्री हर्षवर्धन यांच्या आरोपानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. मला कुणाशी वाद घालायचा नाही वा मला कोणाला दोष देखील द्यायचा नाही. महाराष्ट्र मोठे राज्य आहे येथे आठवड्याला 40 लाख वॅक्सिन लागतात त्यामुळे त्या दिल्या जाव्यात इतकीच आमची मागणी असल्याच राजेश टोपे म्हणाले होते.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. कोरोना लसीच्या नादात चाचण्या करण्याकडे आपलं दुर्लक्ष झाल्यानेच कोरोना वाढला अस मत मोदींनी व्यक्त केले. तसेच येत्या 11 ते 14 एप्रिलपर्यंत ‘लसीकरण उत्सव’ साजरा केला जाणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

आपल्याला कोरोना व्हायरससोबत कोरोना लसीशिवाय लढायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे. यामुळे कोरोना चाचण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कोरोना चाचण्या वाढवायला हव्यात, असे मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या : 

‘भारतातर्फे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्याचे स्वप्न’

सामन्यापूर्वी विराटाचे ट्विट ; मुंबई इंडियन्सला सावधगिरीचा इशारा

मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी ; आजपासून रंगणार आयपीएलचा थरार

जालना – नांदेड समृद्धी जोडमहामार्गाच्या द्दष्टीने हालचाली सुरू : अशोक चव्हाण