पुण्याच्या विकासासाठी मला लोकसभेच्या निवडणुकीत साथ द्या : गिरीश बापट

blank

टीम महारष्ट्र देशा : काही दिसांवर येवून ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी गुलटेकडी मार्केट यार्ड येथे पदयात्रा काढून प्रचार केला. यावेळी बापट यांनी व्यापारी, अडते, ग्राहक, कामगार व कष्टकरी लोकांना प्रत्यक्ष भेटून पुण्याच्या विकासासाठी मला लोकसभेच्या निवडणुकीत साथ द्या असे आवाहन केले.

यावेळी गिरीश बापट म्हणाले की, पालकमंत्री म्हणून काम करत असताना या मार्केट यार्ड मधील अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली. तर मार्केट मध्ये चांगल्या प्रकारचे रस्ते व्हावेत, कचऱ्याचा प्रश्न सुटावा, यासाठी मी प्रयत्नशील राहिलो. तसेच बापट पुढे म्हणाले की, मार्केट मधील प्रश्न जाणून घेण्यासाठी मी व्यापाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांसोबत बैठक घेतली. तसेच सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी देखील समस्या जाणून घेण्यासाठी व्यापाऱ्यांसोबत बैठका घेतल्या.

पुणे ही जागतिक पातळीवरील बाजारपेठ आहे. त्यामुळे पुणे जिल्हा व शहरातील अनेक लोकांची या बाजारपेठमुळे सोय झाली आहे. तसेच भविष्यात खासदार या नात्याने मार्केट यार्ड अधिकाधिक चांगलं व्हावं यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. असे देखील बापट म्हणाले.

दरम्यान पुण्यात युतीकडून भाजपचे उमेदवार गिरीश बापट हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे तर त्यांना टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसने ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांना रिंगणात उतरवल आहे. त्यामुळे पुण्यामध्ये कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळणार आहे.