fbpx

व्हीआयपी जागेत बसण्यास जागा मिळाली हीच मेहरबानी समजा! भाजपचा काँग्रेसवर पलटवार

rahul gandhi

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना प्रजासत्ताक दिनी राजपथावरील सोहळ्यात चौथ्या रांगेत सांगून सहाव्या रांगेत बसवलं. भाजप सरकारने दिलेल्या असा वागणुकीमुळे संतापलेल्या काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. तसेच राहुल भक्त दुखावलेले आहेत. राजकारणात खुर्चीसाठी भांडण तर पाहायला मिळायचेचं. आता खुर्ची योग्य जागेवर हवी म्हणून भांडण होत आहेत. त्यामुळे राजकीय चर्चेला उधान आलं आहे. काँग्रेसच्या टीकेनंतर भाजपने काँग्रेसवर पलटवार केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना व्हीआयपी जागेत बसण्याची जागा मिळाली ही मेहरबानी असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.

राहुल गांधी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात व्हीआयपी पाहुण्यांचा सहाव्या रांगेत बसले होते. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर टीका करत म्हटलं होतं की, अहंकारी भाजपला परंपरांचा विसर पडला आहे आणि राहुल गांधींना त्यांनी मुद्दाम सहाव्या रांगेत बसवलं. त्यानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेसला आठवण करून दिली की, काँग्रेसच्या कार्यकाळात भाजप अध्यक्षांना व्हीआयपी पाहुण्यांच्या सोबत बसवलंही जात नव्हतं.

काय म्हणाले भाजप प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव ?

काँग्रेस अध्यक्ष व्हीआयपींमध्ये बसण्यास योग्य नाही तरीही आम्ही त्यांचा सन्मान केला. काँग्रेसच्या विचारातून लोकशाही दिसेनाशी झाल्याचं दिसत नाही. देश त्यांच्या कुटुंब आणि वंशांच्या नावावर चालत असल्याची त्यांची मानसिकता लोकशाहीच्या विरुद्ध आहे. तसेच विरोधी पक्षांचा सन्मान करणे आमची संस्कृती आहे. काँग्रेस सत्तेत होती त्यावेळी त्यांनी आमच्या अध्यक्षांचा कधीही सन्मान केला नाही.

.