८ दिवसांत संभाजी भिडेंना अटक करा अन्यथा परिणाम भोगायला तयार रहा

टीम महाराष्ट्र देशा : संभाजी भिडे गुरुजींना आठ दिवसांत अटक करा, अन्यथा सरकारनं याचे गंभीर परिणाम भोगायला तयार राहावे, असा इशारा आज भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. एल्गार रॅलीच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते

Loading...

कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघानं एल्गार मोर्चा काढला होता. त्या एल्गार मोर्चाला आंबेडकरी जनतेनं चांगला प्रतिसाद दिला. जिजामाता उद्यान ते विधान भवनदरम्यान काढण्यात आला असून, भारिप बहुजन महासंघाच्या एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. याच मोर्चाच्या समारोपाप्रसंगी प्रकाश आंबेडकरांनी हा इशारा दिला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी संभाजी भिडे गुरुजींना पाठीशी घालत आहेत. सरकारनं कोर्टाचं काम करू नये, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.Loading…


Loading…

Loading...