महाराष्ट्र बंद : मराठा मोर्चां विरोधात हायकोर्टात याचिका

हिंसाचार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मागणी

मुंबई – मराठा मोर्चांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून, हिंसा करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याची मागणी या याचितेतून करण्यात आली आहे.

मराठा मोर्चांविरोधात अॅड. आशिष गिरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान हिंसक कृत्ये करणाऱ्यांना शोधून काढावे, हिंसा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, तसेच अशा मोर्चांवर बंद घालावी, अशी मागणी या याचिकेमधून करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा समाजानं ‘महाराष्ट्र बंद’ची दिली होती. या आंदोलनाला पुण्यात हिंसक वळण लागले. चांदनी चौक परिसरात आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. तर पुण्यात मोर्चाची सांगता झाल्यानंतर काही मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवरुन चढत कार्यालयात तोडफोड केली.

नाशिकमध्‍ये ठिय्या आंदोलनादरम्‍यान मराठा आंदोलकांच्‍या दोन गटांतच हाणामारी झाली. सिन्‍नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे आंदोलन स्‍थळावरील स्‍टेजवर गेल्‍याने त्‍यांचे समर्थक व इतर मराठा आंदोकांमध्‍ये वाद झाला. क्षणातच बाचाबाचे रुपांतर हाणामारीत झाले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्‍तक्षेप केल्‍याने वाद जास्‍त भडकला नाही. सध्‍या तेथे शांततेत आंदोलन सुरू असल्‍याची माहिती आहे.

औरंगाबाद शहरातील वाळूज औद्योगिक वसाहतीत दुपारपर्यंत प्रत्येक चौकात शांततेने सुरू असलेले आंदोलन दुपारनंतर चांगलेच चिघळले. औद्योगिक वसाहतीतील जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन, कॉस्मो, बुस्टर, गुड इयर, सेन्टेक्स, क्राम्प्टन ग्रीव्हज, बीकेटीसह एकुण १२ पेक्षा अधिक कंपन्यांमध्ये आंदोलकांनी घुसखोरी करीत पार्किंगमध्ये उभी असलेली कामगारांची दुचाकी वाहने तोडफोड करीत पेटवून दिली.

आमदार त्र्यंबक भिसेंच्या गाडीवर दगडफेक
सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला हिंसक वळण लागले आहे. लातूरमध्ये आमदार त्र्यंबक भिसेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. संतप्त आंदोलकांनी धक्काबुक्की देखील केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

You might also like
Comments
Loading...