‘हा क्षण अनुभवण्यासाठी खेळत असतो’ ; खास फोटो शेअर करत दिपकची भावूक पोस्ट

chhar

श्रीलंका : भारताची ‘युवा’ टीम सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेटने विजय मिळवला आहे. दुसरा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली आहे.

भारताला विजयासाठी 276 धावांची गरज असताना पहिल्या आणि मधल्या फळीतील आघाडीचे बॅट्समन स्वस्तात माघारी परतले. 193 धावांवर सात विकेट्स असताना विजयाची आशा मावळली होती. हातात ३ विकेट्स असताना ८३ धावांची गरज होती. अशात दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमारने केलेली भागीदारी ही निर्णायक ठरली. या दोन्ही खेळाडूंनी संयमी खेळी केली आणि श्रीलंकेच्या घशातून हा विजय खेचून आणला.

या सामन्यानंतर दीपक चाहरने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर आपला विजयी चौकाराचा व्हिडिओ तसेच त्याने इंस्टग्रामवर विजय मिळवल्यानंतर सहकारी खेळाडू त्याच्याकडे धाव घेत असतानाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत चाहर त्याला एक कॅप्शनही दिलं आहे. त्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, “हा क्षण अनुभवण्यासाठी खेळत असतो”  तसेच शेअर केलेल्या व्हिडिओवर त्याने कॅप्शन दिलं की “हा क्षण आम्ही कधीच विसरू शकत नाही. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार.”

महत्वाच्या बातम्या 

IMP