पार्श्वगायक गायक सुनिधी चौहान यांना मुलगा झाला

sunidhi chauhan with his son

टीम महाराष्ट्र देशा : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान आई झाली आहे. 1 जानेवारी रोजी सुनिधीने मुलाला जन्म दिला आहे. एक प्लेबॅक सिंगर म्हणून सुनिधीने जे स्थान मिळवले आहे. सिंगिंग करिअरमध्ये सुनिधीने अनेक गाजलेल्या गाण्यांना स्वरसाज दिला. आपल्या सुमधूर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी सुनिधी वयाच्या 34 व्या वर्षी आई झाली आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून तिने गायनाला सुरुवात केली होती.

sunidhi_chauhan-

शालेय जीवनात सुनिधी दिल्लीत अनेक ठिकाणी स्टेज परफॉर्मन्स देत होती. याच काळात टीव्ही अँकर तबस्सुम यांची नजर सुनिधीवर पडली. त्यांनी आपल्या एका शोमध्ये सुनिधीला गाण्याची संधी दिली आणि तिच्या कुटुंबाला मुंबईत स्थायिक होण्याचा सल्ला दिला. तबस्सुम यांनीच सुनिधीची भेट प्रसिद्ध संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी सोबत घालून दिली. त्यांनी सुनिधीला त्यांच्या ग्रुपमध्ये गाण्याची संधी दिली होती.

sunidhi

वयाच्या 13व्या वर्षी ‘मेरी आवाज सुनो’ या शोचे विजेतेपद पटकावल्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी सुनिधीला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला. मस्त या सिनेमात तिने पहिले बॉलिवूड गाणे गायले आहे. हे गाणे जबरदस्त हिट ठरले. या गाण्यासाठी सुनिधीला तब्बल 14 वेगवेगळ्या अवॉर्ड्ससाठी नॉमिनेशन मिळाले होते. यापैकी दोन अवॉर्ड्स सुनिधीच्या नावे आहेत. sunidhi

14 ऑगस्ट 1983 रोजी नवी दिल्लीत जन्मलेल्या सुनिधी चौहानचे बालपणीचे नाव निधी चौहान असे होते. सुनिधी चौहानने पहिले लग्न 2002 मध्ये वयाच्या 18 वर्षी दिग्दर्शक बॉबी खानबरोबर केले होते. बॉबी सुनिधीपेक्षा चौदा वर्षांनी मोठा होता. या लग्नाला सुनिधीच्या घरच्यांचा विरोध होता. मात्र तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन बॉबी बरोबर लग्न केले. पण वर्षभरदेखील त्यांचे लग्न टिकू शकले नाही आणि या दोघांचा घटस्फोट झाला.

sunidhi chauhan and husbandएप्रिल 2012 मध्ये सुनिधीने दुसरे लग्न केले. बालपणीचा मित्र आणि म्युझिक डायरेक्टर हितेश सौनिकबरोबर सुनिधीने संसार थाटला आहे. आता या दाम्पत्याच्या जीवनात चिमुकल्याचे आगमन झाले आहे.

sunidhi chauhan and husband

सुनिधीने केवळ हिंदीतच नव्हे तर उर्दू, उडिया, पंजाबी, मराठी, तामिळ, तेलगू, भोजपुरी, बंगाली, आसामी, गुजराती आणि नेपाळी भाषेत गाणी गायली आहेत.

sunidhi chauhan and husbandतिची टशन (छलिया), दोस्ताना (देसी गर्ल), रब ने बना दी जोडी (डांस पे चांस मार ले), रेस (रेस सांसो की..)धडक-धडक (बंटी और बबली), भागे रे मन (चमेली), महबूब मेरे (फिजा), धूम मचाले (धूम), बीड़ी जलइले (ओमकारा) और चोर बाजारी (लव आज कल), शीला की जवानी ही गाणी हिट ठरली.

14 ऑगस्ट 1983 रोजी दिल्लीत जन्मलेली सुनिधी प्रतिभावंत असल्याचे तिच्या वडिलांनी तिच्या बालपणीच ओळखले होते. वयाच्या केवळ चौथ्या वर्षापासून तिने मंदिरात गायन सुरु केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर 

1 Comment

Click here to post a comment