खेलो इंडिया : वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राला दोन पदके

पुणे : वेटलिफ्टिंगमधील महाराष्ट्राच्या मयुरी देवरे हिने २१ वर्षाखालील मुलींमध्ये ब्राँझपदक मिळविले. तिने ७६ किलो गटात स्नॅचमध्ये ७९ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ९७ किलो असे एकूण १७६ किलो वजन उचलले. या गटात तामिळनाडूच्या अलीषा आरोकिया हिने सुवर्णपदक पटकाविले. तिने स्नॅचमध्ये ८५ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १०८ किलो असे एकूण १९३ किलो वजन उचलले. मणीपूरच्या ए.तुमीना देवी हिने रौप्यपदक मिळविताना स्नॅचमध्ये ७७ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १०० किलो असे एकूण १७७ किलो वजन उचलले.

महाराष्ट्राच्या श्रेया गुणमुखी हिने १७ वर्षाखालील ७६ किलो गटात रौप्यपदक पटकाविले. तिने स्नॅचमध्ये ६६ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ८१ किलो असे एकूण १४७ किलो वजन उचलले. हरयाणाच्या तमन्नाकुमारी हिने सुवर्णपदक जिंकताना स्नॅचमध्ये ७५ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ८१ किलो असे एकूण १७२ किलो वजन उचलले. आंध्रप्रदेशच्या सी.एस.लक्ष्मी हिने ब्राँझपदक जिंकले. तिने स्नॅचमध्ये ५८ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ८१ किलो असे एकूण १३९ किलो वजन उचलले.

७१ किलो गटात कर्नाटकच्या अक्षता कामाटी व लावण्या राय यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकांची कमाई केली. अक्षता हिने स्नॅचमध्ये ७३ तर क्लीन व जर्कमध्ये १०३ किलो आणि एकूण १७६ किलो वजन उचलले. लावण्या हिने स्नॅचमध्ये ७९ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ९५ किलो आणि एकूण १७४ किलो वजन उचलले. अरुणाचल प्रदेशच्या पी.एच.रोशनी हिने अनुक्रमे ७७ व ९० असे एकूण १६७ किलो वजन उचलीत ब्राँझपदक पटकाविले. १७ वर्षाखालील मुलींमध्ये आंध्रप्रदेशची पी.धात्री हिला सुवर्णपदक मिळाले. तिने स्नॅचमध्ये ७० तर क्लीन व जर्कमध्ये ८१ किलो आणि एकूण १५१ किलो वजन उचलले. केरळच्या अंजना श्रीजित हिने स्नॅचमध्ये ६५ तर क्लीन व जर्कमध्ये ८० किलो आणि एकूण १४५ किलो वजन उचलीत रौप्यपदक मिळविले. स्नॅचमध्ये ६४ तर क्लीन व जर्कमध्ये ७८ किलो आणि एकूण १४२ किलो वजन उचलणाºया ज्योती यादव या हरयाणाच्या खेळाडूला ब्राँझपदक मिळाले.