महाराष्ट्र इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केला ‘शिव संस्कार’

टीम महाराष्ट्र देशा/प्रा.प्रदीप मुरमे :  लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील महाराष्ट्र इंग्लिश स्कुलच्या बालकलाकारांनी वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त ३५० वर्षापूर्वीचा ‘शिवबां’चा रोमांचकारक व अंगावर शहारे आणणारा इतिहास ‘शिव संस्कार’ या नाटीकेच्या माध्यमातून हूबेहूब सादर करुन प्रेक्षकांना ऐतिहासिक भूतकाळात नेले !

Loading...

महाराष्ट्र विद्यालयाच्या पटांगणावर भव्य स्टेजवर उभा केलेल्या या ऐतिहासिक नाटीकेमध्ये तब्बल २०० पेक्षा जास्त बाल कलाकारांनी आपले अभिनय सादर केले.तब्बल तीन तासाच्या या नाटीकेमध्ये कलाकारांनी कसदार व दमदार अभिनय करुन आपल्या पाञाला न्याय दिल्याने रंगमंचावरील नाटीका सादर होत असताना प्रेक्षक अक्षरशः खुर्चीला खिळून बसले होते. तर आपल्या पाल्याचा सुरेख अभिनय पाहताना अनेक पालक मंञमुग्ध होवून गेले होते.

शिवबाचा जन्मोत्सव,जिजाऊ माँ साहेबांचे शिवबावरील संस्कार,रयतेवरील मुगलशाही व आदीलशाहीचा अत्याचार,मावळ्यांच्या सोबतीने स्वबळावर हिंदवी स्वराज्याची स्थापना,अफजलखान वध व शिवराज्याभिषेक आदी इतिहासकालीन घटना यावेळी बालकलाकारांनी सादर केल्या. प्रेरणा प्रदीप मुरमे हिने जिजाऊ, गणेश जाधव याने शहाजी राजे,शौर्य पाटील याने बाल शिवबा,आदित्य गाडीवान याने शिवाजी महाराज तर अफझलखान याची भूमिका नय्यूम शेख यांनी मोठ्या ताकदीने उभ्या केल्या.त्यामुळे पालकांनी या बालकलाकारांचे तोंडभर कौतुक केले.वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने शहरात प्रथमच शालेय पटांगणावार भव्य दिव्य व देखना सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे शहरातील पालक व विद्यार्थ्यांनी या नाटीकेला मोठी गर्दी केली होती.यावेळी बाल कलाकारांनी मनसोक्त अभिनयाची उधळण करत ३५० वर्षापूर्वीच्या सोनेरी इतिहासाची पाने नाटीकेत सादर करुन उपस्थितांना अक्षरशः थक्क करुन टाकले.या नाटीकेतील गायन,वादन व नृत्याचा सुरेख संगम पाहून पालक भारावून गेले होते ! ‘शिव संस्कार’या नाटीकेमुळे महाराष्ट्र इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेह संमेलन यावर्षी भलतेच गाजले असून जिल्हाभरातील शिक्षण क्षेञात सध्या या नाटकाची जोरदार चर्चा ऐकावयास येत आहे.या देखण्या कार्यक्रमाचे बहारदार सूञसंचलन बालाजी सुळ व रश्मी मँडम यांनी केले तर आभार दीपक इगवे यांनी मानले .माजी मुख्यमंञी डाँ.शिवाजीराव पाटील निलंगेकर,काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर उपविभागीय अधिकारी विकास माने ,इंग्लिश स्कुलच्या सर्वेसर्वा सौ. संगीता पाटील निलंगेकर,प्राचार्य धर्मसिंग शिराळे,महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.व्ही.एल.एरंडे,फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.भागवत पौळ,माजी नगराध्यक्ष विजयकुमार पाटील, डाँ.लालासाहेब देशमुख,प्रा.गजेंद्र तरंगे, लालासाहेब पटेल,प्रा.दयानंद चोपणे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.Loading…


Loading…

Loading...