पुणे स्टेशनवर ३१ मे पर्यंत मिळणार नाही प्लॅटफॉर्म तिकीट ; रेल्वे प्रशासनाची घोषणा

pune station

पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

कोरोना साथीचा धोका टाळण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकात अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी सध्या ३१ मे पर्यंत सामान्य लोकांना प्लॅटफॉर्मची तिकिटे दिली जाणार नाहीत. त्याचबरोबर वृद्ध, अपंग, रूग्ण, गर्भवती महिला, मुले यांसारख्या गरजू प्रवाशांना मदत करण्याच्या उद्देशाने ५० रूपये च्या वाढीव दराने प्लॅटफॉर्मची तिकिटे दिली जात आहेत. करोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच कोल्हापूर, मिरज आणि सांगली स्थानकांवर अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी ३१ मेपर्यंत वाढीव दराने प्लॅटफॉर्म तिकिटे दिली जातील. येथे तिकिटांची किंमत फक्त ५० रुपये असेल. इतर स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाचा दर आधीपासून जारी केलेल्या प्रणालीनुसार साधारणत १० रुपये ठेवला जाईल. पहिल्या लाटेदरम्यान देखील असाच निर्णय घेण्यात आला होता. पहिल्या लाटेत पण प्लॅटफॉर्म तिकीट १० वरून ५० करण्यात आले होते.

दरम्यान, महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.

महत्वाच्या बातम्या