Pune- कोथरूड भागात प्लॅस्टिकच्या अंड्यांची विक्री केली जात असल्याची तक्रार

पुणेकरांनो प्लॅस्टिकच्या अंड्यांपासून सावधान !

पुणे शहरातील कोथरूड भागातून प्लॅस्टिकच्या अंड्यांची विक्री केली जात असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाला प्राप्त झाली आहे . परिस्थीतीची गंभीरता लक्षात घेत एफडीएच्या अधिकाऱ्यांनी संबंधित विक्रेत्याकडून तपासणीसाठी अंडी ताब्यात घेतलीत. प्रयोगशाळेतील तपासणीनंतरच ही अंडी खरी की खोटी आहेत, हे स्पष्ट होईल. गेल्या काही दिवसांपासून कोलकता,चेन्नई , मुंबई या भागात प्लॅस्टिकची अंडी आढळून आली होती. यानंतर मोठी खळबळ माजली होती. मात्र आता या प्लॅस्टिकच्या अंड्यांची एन्ट्री पुण्यात झाल्याची शक्यता आहे. तेव्हा पुणेकरांनो अंडी खरेदी करताना आता दक्षता घेणे गरजेचं बनलय. त्याचप्रमाणे अशा प्लॅस्टिकच्या अंड्यांबाबत संशय आल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आलय. 

अन्न व औषध प्रशासन विभाग पुणे
संपर्क : 020 2446 7259