प्लास्टिकबंदीमुळे 3 लाख नोकऱ्या धोक्यात

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात २३ जून पासून लागू करण्यात आलेल्या प्लास्टिकबंदीच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटायला सुरवात झाली आहे. एकीकडे पर्यावरण रक्षणासाठी हा निर्णय क्रांतिकारी मानला जात असतनाच तिकडे दुसरीकडे या बंदीचा प्लास्टिक उद्योगावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळते आहे. प्लास्टिकबंदीमुळे या उद्योगाला 15 हजार कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज असून, जवळपास 3 लाख नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या प्लास्टिकबंदीमुळे प्लास्टिक आणि थर्माकोल उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. 15 हजार कोटीचे नुकासान अंदाजित असून, जवळपास 3 लाख जणांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे, असे प्लास्टिक बॅग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या राष्ट्रीय सरचिटणीस निमित पुनामिया यांनी स्पष्ट केल आहे. प्लास्टिक बॅग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनशी संबंधित जवळपास अडीच हजार सदस्यांना आपल्या दुकांनाना टाळे ठोकावे लागल्याचेही पुनामिया यांनी सांगितले. तसेच, प्लास्टिकबंदी भेदभाव करणारी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

23 मार्च रोजी महाराष्ट्र सरकारने प्लास्टिक उद्योगांना प्लास्टिकचं उत्पादन थांबवण्यास सांगितले होते. वन टाईम युझ बॅग, चमच, प्लेट्स, बॉटल यांचे वितरणही थांबवण्याचे आदेश होते. त्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजे 23 जूनपासून महाराष्ट्र सरकारने प्लास्टिकवरील बंदी लागू केली.

You might also like
Comments
Loading...