प्लास्टिकबंदीच्या निर्णयावर सरकारची माघार; दुकानदारांना पिशव्या वापरण्याची परवानगी

मुंबई : प्लास्टिकबंदी करताना पुरेशी तयारी न केल्याने, तसेच दुकानदार व व्यापारी यांना पर्यायी साधनं उपलब्ध न करून दिल्याने, अवघ्या पाचच दिवसांमध्ये आपला निर्णय मागे घेण्याची वेळ सरकारवर आली आहे.

दुकानदारांची नाराजी ओढवल्यानं गुरूवारपासून छोट्या दुकानदारांना प्लास्टिक पिशव्या वापरण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे संकेत कदम यांनी दिले आहे.या निर्णयामुळे प्लास्टिक बंदीचा फज्जा उडणार आहे.

प्लास्टिक बंदी करताना त्याला पर्याय काय असेल याची सरकारनं पुरेशी तयारी केली नसल्याचं दिसून आलं होतं. छोटे दुकानदार, किरकोळ भाजी विक्रेते,दुध विक्रेते, हॉटेल चालक यांनी पर्याय देण्याची मागणी सरकारकडे केली होती. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आल्याने या दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यामुळं सरकारच्या निर्णयावर चौफेर टीका झाली होती.