fbpx

सावधान ! उद्यापासून तुमच्या हातात प्लास्टिकची पिशवी दिसल्यास होणार दंड

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात 23 जूनपासून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी लागू होणार आहे. त्यामुळे उद्यापासून जर तुमच्या हातात प्लास्टिकची पिशवी दिसल्यास तुम्हाला पाच हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

तर दुसरीकडे दुकानदार, फेरीवाले, मॉल्स, हॉटेल, हॉस्पिटल या सर्व आस्थापनांकडे बंदी असलेले प्लास्टिक आढळले तर त्यांना पाच ते वीस हजारांपर्यंतचा दंड होऊ शकतो. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे काही व्यापाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.