प्लास्टिक बंदीचा निर्णय लोकाभिमुख – रामदास कदम

प्लास्टिक बंदी, रामदास कदम,

मुंबई  : शासनाने प्लास्टिक बंदीचा लोकाभिमुख निर्णय घेतला असून हा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेच्या फायद्याचाच असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज मंत्रालयात सांगितले.

श्री. कदम म्हणाले, प्लास्टिक बंदी संदर्भात गेल्या ९ महिन्यांपासून विविध माध्यमांद्वारे जनजागृती केली आहे. जनतेचे आणि व्यापाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडविलेले आहेत. बिस्किट, वेफर्स, बेकरी पदार्थ हे प्लास्टिकच्या वेस्टनात दिले जातात. आज त्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध नाही. त्यांना अशा प्लास्टिकचे रिसायकलिंग कसे करणार, याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. उत्पादनाच्या ठिकाणी वस्तू पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक – जसे हस्त-गृह उद्योगांकडून होणारे पॅकेजिंग व ब्रॅन्डेड पॅकेजिंगकरिता उत्पादकांद्वारे वापरण्यात येणारे प्लास्टिक यावर बंदी नाही. पॉलिथिन, नॉनओव्हन पिशव्यावर बंदी असून त्याचे उत्पादन थांबविण्याच्या सूचना उत्पादकांना दिल्या आहेत. प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचे स्वागत अनेक संस्था, सेलिब्रिटींनी केले असून आज मोठ्या प्रमाणात कापडी पिशव्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत.

‘तो’ आरोपी माझा सुरक्षारक्षक नाही; निलंगेकरांचा खुलासा    

गणपती उत्सव, लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सजावटीसाठी थर्माकोलचा वापर होतो. थर्माकोलचे विघटन होत नसल्याने त्याचे गंभीर परिणाम पर्यावरणावर होत आहेत, म्हणून थर्माकोलवर बंदी घातलेली आहे. तरीही गणपती उत्सवासाठी थर्माकोल वापरावर तात्पुरती परवानगी देण्याबाबत उच्चस्तरीय समिती निर्णय घेईल, असेही श्री. कदम यांनी यावेळी सांगितले.

प्लास्टिक कारखान्यातील कामगारांबाबत श्री. कदम म्हणाले, प्लास्टिक बंदी ही आज केलेली नाही. गेल्या ९ महिन्यांपासून प्लास्टिक उत्पादकांना याची जाणीव करुन देण्यात आली आहे. मधल्या काळात पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी त्यांचीच होती. प्लास्टिकच्या वस्तू, कॅरीबॅग बाजारात मिळू नये म्हणून अशा कारखान्यांवर, गोडाऊनवर धाडी टाकण्याचे काम सुरु आहे. या मोहिमेद्वारे सर्वसामान्य माणसाला वेठीस धरण्याचा हेतू नाही. त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी प्लास्टिक बंदी आहे. नागरिकांनी कापडी पिशव्यांना प्राधान्य देऊन शासनाला सहकार्य करण्याचे आवानही श्री.कदम यांनी यावेळी केले.

एकनाथ खडसेंनी दिला आठ दिवसांचा वेळ ; अन्यथा बसणार उपोषणाला…

खालील गोष्टींवर बंदी आहे
१. प्लास्टिक पासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्या (हॅन्डल असलेल्या व नसलेल्या)
२. थर्माकोल व प्लास्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणाऱ्या व फेकाव्या लागणाऱ्या वस्तू, उदा. ताट, कप्स, प्लेटस, ग्लास, वाटी, चमचे.
३. हॉटेलमध्ये अन्नपदार्थ विक्रीसाठी वापरण्यात येणारी व एकदाच वापरुन फेकून देण्यात येणारी भांडी, स्ट्रॉ (प्लास्टिकचा)
४. द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरले जाणारे पाऊच उदा.पिण्याचे पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक पॅक कप्स किंवा पाऊच.
५. प्लास्टिक व थर्माकोलची सजावट

खालील गोष्टींवर बंदी नाही
१. औषधांच्या वेष्टणांसाठी व वैद्यकीय क्षेत्रात वापरले जाणारे प्लास्टिक उदा. सिरप बॉटल, गोळ्यांच्या बॉटल आदी.
२. वन व फलोत्पादन, कृषी व घनकचरा हाताळण्यासाठी तसेच रोपवाटिकांसाठी कंपोस्टेबल प्लास्टिक पिशवी.
३. निर्यातीसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक.
४. उत्पादनाच्या ठिकाणी उत्पादित वस्तूंच्या वापरासाठी वापरले जाणारे प्लास्टिक वेस्टन अथवा प्लास्टिकचे आवरण.
५. दुधाच्या पॅकेजिंगसाठी वापरली जाणारी ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीची प्लास्टिक पिशवी.
६. पेट बॉटल, रेन कोट, प्लास्टिक शूज, फाईल कव्हर, प्लास्टिक चष्मा, फ्लेक्स, ग्लोज, टोपी.
७. थर्माकोल बॉक्स, थर्माकोल पॅकेजिंग, ओव्हन गोणी, पिशवी, घरावर-छतावर वापरले जाणारे प्लास्टिक शिट.
८. उत्पादनाच्या ठिकाणी केले जाणारे प्लास्टिकचे पॅकेजिंग जसे पाव, बिस्कीट, बेकरी उत्पादने, हस्तगृह उद्योगाच्या ठिकाणी पदार्थावर किंवा वस्तूंवर केले जाणारे प्लास्टिकचे पॅकेजिंग.

प्लास्टिक विक्रीवर बंदीच्या निषेधार्थ विक्रेत्यांचा दुकान बेमुदत बंदचा निर्णय

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...