भारतापाठोपाठ आता ‘या’ देशानेही घेतला प्लास्टिक बंदीचा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली . त्याचप्रमाणे आता जगभरातही काही देशांत प्लास्टिकवर बंदी घालण्यात येत आहे. आता ऑस्ट्रेलियातील रिटेल कंपन्यांनी प्लास्टिकवर बंदी सुरू केली आहे. यातून रिटेल स्टोअरमध्ये ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात वाद होत आहे.

युनायटेड किंगडमसह 60 देशांत पुनर्वापर करता न येणाऱ्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात कचरा कमी करण्याच्या उद्देशान सहापैकी 4 राज्यांत प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. नव्या नियमांनुसार प्लास्टिकचा वापर करणाऱ्या रिटेल कंपन्यांना दंड भरावा लागणार आहे.

या आठवड्या पासून या बंदीची अंमलबजावणी सुरू केली आहे . बंदी नंतर रिटेल स्टोअरमधील कर्मचारी आणि ग्राहक यांच्यामध्ये वाद आहेत. तेथील नागरिकांकडून प्लास्टिकबंदी म्हणजे भ्रष्टाचार असल्याचा आरोप करण्यात येतोय.

पुण्यात रंगली ‘प्लास्टिकबंदी आणि कारवाई’ यावर महाचर्चा…