केईएम हॉस्पिटलमध्ये छताचे सिलिंग कोसळले ; दोन रुग्ण जखमी

मुंबई : मुंबईतल्या केईएम हॉस्पिटलमधील डायलीसीस विभागातील छताला असलेले सिलिंग कोसळलं आहे. याच सिलिंगमध्ये ट्युबलाईट आणि इलेक्ट्रीक वायरचं जाळं ही होतं. छतावरील सिलिंग कोसळल्यामुळे दोन रुग्ण जखमी झाले आहेत. काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

या दुर्घटनेत दोन रुग्णांना किरकोळ जखम झाली असून, त्यांना तातडीने दुसरीकडे हलवण्यात आले आहे. केईएम हॉस्पिटलचे दोन कर्मचारीही किरकोळ जखमी झाले आहेत

केईएम हॉस्पिटलमध्ये काही वर्षांपूर्वीच नुतनीकरण झालं होतं. त्यानंतरही अशा प्रकारे छताचं सिलिंग कोसळल्यामुळे हॉस्पिटलमधील रुग्णांची सुरक्षा आणि दूरावस्थावर पुन्हा एकदा प्रश्नं उपस्थित होतायेत.