आणि झाडांना स्वातंत्र्य मिळाले…

आळेयुक्त झाडे या ‘वनराई’ आणि ‘अंघोळीची गोळी’ यांच्या संयुक्तपणे आयोजित उपक्रमाला सुरुवात...

पुणे : झाडांचे सैनिक होऊया, चला झाडांना आळे करूया अशी गर्जना करत असंख्य निसर्गप्रेमी पुण्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त एकवटले. वनराई आणि अंंघोळीची गोळी यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या आळेयुक्त झाडे या उपक्रमाचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनानिमित्त झाला. यावेळी खा. वंदनाताई चव्हाण, डॉ. सतीश देसाई, माधव पाटील, अंकुश काकडे, नगरसेवक धीरज घाटे ,श्याम मानकर, दिलीप सेठ ,नितीन जाधव, दिलीप मेहता, अमित वाडेकर, धनंजय देशपांडे, विध्यार्थी आणि अंघोळीची गोळीचे कार्येकर्ते उपस्थित होते. लोकमान्य नगर येथील जॉगर्स पार्कच्या प्रवेश द्वाराजवळील झाडांना आळे करून या उपक्रमाला सुरुवात झाली.

नुकताच भारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याचेच औचित्य साधत पुण्यामध्ये निसर्गासाठीच्या नव्या स्वातंत्र्य संग्रामाची सुरुवात झाली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील झाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आपण उत्साहाने लहान रोपटं लावतो पण उद्या त्या झाडाची हक्काची जमीन आणि पाणी हे सिमेंट, डांबर आणि पेव्हिंग ब्लॉक हिरावून घेणार असतील तर? आपण गप्प बसणार आहोत का? झाडाला लागूनच सिमेंट, डांबर, पेव्हिंग ब्लॉक लावून झाडांचं स्वातंत्र्य हिरावले जात आहे. झाडांच्या हक्काची जमीन आणि पाणी या साध्या मूलभूत गरजा त्याला मिळाव्यात यासाठी पुण्यात एक अनोखा उपक्रम सुरू झाला आहे. वनराई आणि आंघोळीची गोळी यांच्या संयुक्तपणे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया म्हणाले कि, राष्ट्रीय हरित लवाद (NGT) च्या २०१३ च्या आदेशानुसार प्रत्येक झाडाला १ मीटर व्यासाचे आळे पाहिजे जेणेकरून त्या झाडाला जगण्यासाठी पुरेसं पाणी आणि वाढण्यासाठी हक्काची जमीन मिळेल. त्याद्वारे नैसर्गिकरित्या जलपुनर्भरण होईल. आज कोणत्याही शहरात झाडांचे गळे हे सिमेंट,डांबर आणि पेविंग ब्लॉकने आवळलेले असतात. ह्यामुळे झाडांच्या बुंध्याजवळ झिरपणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून जाते. शिवाय झाडे कमकुवत होऊन एक दिवस उन्मळून पडतात. आज झाडे लावण्यासोबतच झाडांचे संगोपन करण्याची गरज असल्याचे धारिया म्हणाले.

कवी मनाच्या अटलजींच मराठी प्रेम

 

You might also like
Comments
Loading...