सरकारच्या आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे लागवड योजनेचा असा घ्या लाभ

टीम महाराष्ट्र देशा : आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला पिके लागवड योजना असे या योजनेचे नाव आहे. आदिवासी क्षेत्रातील शेतकरी वर्गाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. उत्पादन वाढ असा या योजनेचा प्रकार आहे. लाभार्थी हा आदिवासी क्षेत्रातील कुपोषणग्रस्त गावांमधील आदिवासी असावा व त्याच्या कुबांकडे कुटुंबाकडे शेतजमिन किंवा परसबाग उपलब्ध असावी अशी या योजनेची प्रमुख अटी आहे.

आदिवासी कुटुंबाच्या आहारात जिवनसत्व व इतर आवश्यक पोषक द्रव्ये उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या भागासाठी पोष्टीक आहार योजना सुरु केली आहे. याकरिता अ, क या जिवनसत्वाची आणि लोह व खनिजाचा पुरवठा करण्याच्या फळे व भाजीपाला पिकाची आदिवासीच्या परस बागेत लागवड करुन आहार अन्नद्रव्याच्या दृष्टीने परिपूर्ण करणे असा या योजनेचा उद्देश आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज, 7/12 व 8-अ उतारा ही कागदपत्रे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी रु. 250/- प्रमाणे अनुदान देय आहे. लाभार्थीकडे स्वत:ची अवजारे नसल्यास प्रती लाभार्थी रु. 150/-किंमतीची फळझाडे/भाजीपाला लागवड साहित्य पुरवठा व रु. 100/- किंमतीचे अवजारांचा संच पुरविण्यात येतो असे दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप आहे.

नमुना अर्जामध्ये शेतकयाने स्वत:ची माहिती भरुन आवश्यक कागदपत्रांसह (7/12 व 8-अ उतारा) संबंधीत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावा अशी अर्ज करण्याची पद्धत आहे. संबंधीत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी असे संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता आहे.

महत्वाच्या बातम्या