सुट्ट्यांचे प्लॅनिंग करताय? काही मस्त पर्याय तुमच्यासाठी

मे महिना आला कि, या सुटीत तुम्ही आपले कुटुंबीय किंवा मित्र-मैत्रीणींबरोबर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी काही चांगली ठिकाणे माहित असणे आवश्यक आहे. अशाच काही मस्त पर्यायांवर नजर टाकुयात…

1) दक्षिण भारत : सध्याच्या हवामानात फिरण्यासाठी दक्षिण भारत हा उत्तम पर्याय ठरु शकतो. यामध्ये कुर्ग, बँगलोर-उटी-म्हैसूर, कन्याकुमारी, केरळ, अंदमान याठिकाणी जाऊ शकता.

2) हिमाचल प्रदेश आणि काश्मीर : जर तुम्हाला व्यायामाची सवय असेल आणि नियमित ट्रेकिंग करण्याचा सराव असेल तर तुम्ही याठिकाणी नक्की जाऊ शकता. तसेच पाण्यातील साहसी खेळांसाठीही याठिकाणी अनेक पर्याय आहेत. तसेच आता याठिकाणी मोकळे हवामान असल्याने नीट फिरताही येते.

3) कोकण : कमी सुटी असेल आणि बजेटही नसेल तर महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी हा फिरायला जाण्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. अलिबाग, दापोली, गुहागर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तारकर्ली असे अनेक समुद्रकिनारे आहेत. याठिकाणी समुद्रकिनाऱ्याबरोबरच वॉटरस्पोर्टस आणि इतरही काही पर्यटनस्थळे आहेत.